माणसाच्या महत्त्वाकांक्षा कधीच संपत नाहीत; भगवानही बनू पाहतो, मोहन भागवतांचा रोख कुणाकडं?

माणसाच्या महत्त्वाकांक्षा कधीच संपत नाहीत; भगवानही बनू पाहतो, मोहन भागवतांचा रोख कुणाकडं?

RSS Chief Dr. Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा रोख कुणाकंडं आहे याबाद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (Mohan Bhagwat) भागवत म्हणाले, माणसाच्या महत्त्वाकांक्षा या कधीच संपत नाहीत. स्वविकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसाला ‘सुपरमॅन’ व्हायचं असतं आणि त्यानंतर तो ‘देवता’ आणि ‘भगवान’ ही बनू पाहतो. त्याच्या मनामध्ये विश्वरूपाचीही आस असते पण त्याच्यानंतर पुढं काय असतं? हे कुणीच खात्रीलायकपणं सांगू शकत नाही’ त्यामुळे लोकांनी मानवतेसाठी काम करायला हवं. असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. (RSS) ते झारखंडमध्ये ग्रामीण पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

भारत हा एक सुंदर देश विशाळगड हिंसाचाराला सरकार कसं काय जबाबदार? अजितदादांचा संभाजीराजेंना सवाल

अनेकजण हे माणूस असतात पण त्यांच्यामध्ये माणसाचे गुण मात्र नसतात. आधी त्यांनी माणूस व्हायला हवं. स्वतःच्या बाह्य आणि अंतर्गत प्रगतीसाठी आणि विकासासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. प्रत्येकाने मानवतेसाठी अथक मेहनत घ्यायला हवी. कार्यकर्त्याने त्याच्या कामावर कधीच समाधानी असता कामा नये. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये अथकपणे काम करायला हवं. या सगळ्याला कोठेच अंत नाही पण सातत्याने काम करत राहणं हाच यावरील एकमेव प्रभावी उपाय आहे. ज्या प्रमाणे भारत हा एक सुंदर देश आहे त्याचप्रमाणे आपण हे जग देखील सुंदर करायला हवं असं भागवत यावेळी म्हणाले.

मार्ग बदलावे लागतील

भारताचा स्वभाव हा जंगल आणि शेतांमधून साकार झाला असून त्यातूनच सनातन धर्माचा जन्म झाला आहे. सनातन संस्कृती आणि धर्म हा शाही महालांमधून आलेला नाही तर तो आश्रम आणि जंगलांतून आला आहे. बदलत्या काळानुरूप आपली वेशभूषा बदलेल पण स्वभाव मात्र बदलणार नाही. बदलत्या काळानुरूप आपण आपल्या कामाची पद्धत देखील बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला मार्ग बदलावे लागतील. ज्यांचा निसर्गाशी संबंध कायम राहील ते विकसित ठरतील, असं भाकितही भावतांनी यावेळी केलं आहे..

गावांवर विश्वास तर मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन; IAS पूजा खेडकर प्रकरणात बच्चू कडुंची उडी!

जंगलामध्ये आजही आपले आदिवासी बांधव हे शांततेने जीवन व्यतीत करत आहेत. त्यांच्याबाबतीत आपल्याला शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये अधिक भरीव काम करायला हवं. आम्ही गावकऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो पण शहरांमध्ये मात्र खूप काळजी घ्यावी लागते. आपण कोणाशी बोलत आहोत? हे पडताळून पाहावं लागतं, असंही भागवत यांनी यांवेळी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube