…तर मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन; IAS पूजा खेडकर प्रकरणात बच्चू कडुंची उडी!
Bacchu Kadu On IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरसह (Bacchu Kadu) जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (IAS Pooja Khedkar) यांनी दिला. कडू यांनी या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना लेखी पत्र देऊन मागणी केलीयं. दरम्यान, राज्यात IAS पूजा खेडकर प्रकरण चांगलच चर्चेत आलंय. खेडकर यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात आता बच्चू कडू यांनीही उडी घेत आंदोलनाचा इशारा दिलायं.
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न…; जयंत पाटलांची बोचरी टीका
बच्चू कडू निवेदनात म्हटले, IAS पूजा खेडकर यांनी आपण दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे. प्रत्यक्षदर्शी पूजा खेडकर 40 टक्के दिव्यांग असल्याचं दिसून येत नाही. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करण्यात यावी, यासोबतच जबाबदार अधिकाऱ्यांचीही येत्या 15 दिवसांत चौकशी व्हावी, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचं कडू यांनी निवदेनात स्पष्ट केलंय.
ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक विवेक वाघ यांचं निधन; मरणोत्तर केलं अवयवदान
ओबीसी प्रवर्गातून पूजा खेडकर यांची युपीएससीसाठी निवड झाली आहे. त्यासाठी त्यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रही सादर केलं आहे. मात्र, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक आयोगात दिलेल्या माहितीनूसार त्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षाही जास्त आहे, असं असतानाही पूजा खेडकर यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळालंच कसं? हे प्रमाणपत्र त्यांना कोणी दिलं? याबाबतचीही चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केलीयं.
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे :
पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना खाजगी ऑडी कारवर लाल दिवा लावला.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केबिन बळकावलं.
पूजा खेडकर यांची ऑफिसमधील वागणूकही राजेशाही
वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असताना ओबीसी प्रवर्गातून युपीएससीसाठी निवड.
दृष्टीहीन असल्याचं भासवून दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS ची रॅंक मिळवली.
अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेळा अर्ज आणि दोन प्रमाणपत्र घेतल्याची माहिती उघड
अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते दिल्याचं समोर