‘मला आरएसएसचा तिरस्कार’ केरळमध्ये 26 वर्षीय इंजिनिअरची 15 पानी सुसाईड नोट लिहित जीवन संपवलं?
Software Engineer केरळमध्ये इंजिनिअरचा मृतदेह लॉजमध्ये लटकलेला सापडला. त्याने 15 पानी सुसाईट नोट लिहून आरएसएसबद्दल धक्कादायक दावा केला.

Software Engineer ends life with 15 page note says I Hate RSS : केरळमध्ये तिरूअनंतपुरममध्ये 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह थंपनूरमधील एका लॉजच्या खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमधील धक्कादायक बाब म्हणजे या तरूणाने 15 पानी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवकांबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
केरळमध्ये तिरूअनंतपुरममध्ये कोट्टायम जिल्ह्यातील थाम्पलकड येथील 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह थंपनूरमधील एका लॉजच्या खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता. त्याबरोबर एक 15 पानी सुसाईड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये मृत तरूणाने लिहिले आहे की, मला आरएसएसचा तिरस्कार आहे. मला एक व्यक्ती आणि एका संघटनेशिवाय कुणावरही राग नाही. ती संघटना म्हणजे आरएसएस त्या व्यक्तीशी माझ्या वडिलांनी मला ओळख करून दिली होती. जेव्हा मी 3-4 वर्षांचा होतो. तेव्हापासून माझे लैंगिग शोषण होत आहे. त्याच्यासाठी मी सेक्स टॉय आहे. त्याने मला ओसीडी आजार झाला आहे.
मी कुठेच नाही तर, मोदींकडे जाईल; भुजबळांच्या मनात काय?
त्या माणसाने लग्न केले. तरी देखील तो माझं शोषण करतच होता. त्यामुळे मी भीतीने जगत होतो. तसेच माझ्या घरी येणाऱ्या आरएसएस स्वयंसेवकांनी यावर काहीही केले नाही. उलट ते मला काठ्यांनी मारहाण करायचे तसेच माझ्यासारखे अनेक लोक आहेत. ज्यांना असे अनुभव आले आहेत. जे आरएसएसशी संबंधित होते. त्यामुळे कोणत्याही आरएसएस स्वयंसेवकाशी मैत्री करू नका. असा सल्ला देखील .या तरूणाने त्याच्या या चिठ्ठीमध्ये दिला आहे.
संजय राऊतांची प्रकृती बिघडली, पत्रकार परिषद संपताच मुलंडच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल
दरम्यान या घटनेनंतर कॉंग्रेसकडून आरएसएसर उत्तर मागितले गेले आहे. कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, आरएसएसने तातडीने यावर स्पष्टीकरण द्यावे कारण देशभरातली लाखो मुले आणि अल्पवयीन मुलं या कॅम्पमध्ये जातात. तसेटच मुलांवर देखील मुलींप्रमाणे लैंगिग अत्याचार होतात. या गुन्ह्यांवर मौन सोडले पाहिजे.