… म्हणून सीबीआयकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक, अडचणीत होणार आखणी वाढ?

… म्हणून सीबीआयकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक, अडचणीत होणार आखणी वाढ?

Arvind Kejriwal : आज (26जून) रोजी सीबीआयने (CBI) मोठी कारवाई करत दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी (liquor Scam Case) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक केली आहे. अटकेपूर्वी सीबीआयकडून केजरीवाल यांना  दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) हजर करण्यात आले होते.

सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायमूर्ती अमिताभ यांच्या खंडपीठाकडे केजरीवाल यांच्या रिमांडची मागणी केली होती जी खंडपीठाने मान्य केली. तर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक का ? करण्यात आली आहे याचा खुलासा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

न्यायालयात याबाबत माहिती देताना सीबीसीयने सांगितले की, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहे. तसेच एका मद्य व्यवसायिकाने 16 मार्च 2021 रोजी केजरीवाल यांना संपर्क साधला होता आणि 20 मार्च रोजी के कविता आणि मागुंथा रेड्डी यांची भेट झाली या भेटीचा आयोजन आम आदमी पार्टीचे संपर्क प्रभारी विजय नायर यांनी केला होता. अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली.

तसेच जेव्हा संपूर्ण देशात कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा, लॉकडाऊन लागू असताना देखील दक्षिणेकडील एक टीम खासगी विमानाने दिल्लीत आली होती आणि बुकीबाबू यांनी विजय नायर यांना अहवाल दिला आणि त्यानंतर फाइल सिसोदिया यांच्यापर्यंत पोहोचली.असेही सीबीआयकडून कोर्टात सांगण्यात आले आहे.

तसेच दिल्लीचे दारू धोरण काय असावे हे देखील या भेटीदरम्यान साउथ ग्रुपने सांगितले होते तसेच आमच्याकडे गोवा ट्रेलबाबत पुरेसे पुरावे असून कोणी कोणाला पैसे दिले याची देखील आमच्याकडे माहिती असल्याने केजरीवाल यांची अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली.

तसेच ॲडव्हान्स म्हणून साउथ ग्रुपने 100 कोटी रुपये दिले होते ज्यामुळे नफ्याचे प्रमाण 6 वरून 12 पर्यंत वाढले. या ग्रुपकडून सर्व पैसे रोख देण्यात आले होते. तसेच आम्ही आतापर्यंत 44 कोटी रुपये शोधण्यात यशस्वी झालो आहोत आणि हे पैसे गोव्यात कसे पोहोचले आणि ते कसे वापरण्यात आले याची देखील माहिती आम्हाला मिळाली आहे. चनप्रीत सिंग निवडणुकीसाठी, गोव्याच्या उमेदवारांसाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामासाठी पैसे देत होते असं देखील सीबीआयकडून सांगण्यात आले.

विजय नायर यांच्यामार्फत अभिषेक बोईनपल्ली यांनी मनीष सिसोदिया यांना अहवाल पाठवला होता. सिसोदिया यांचे सचिव सी अरविंद यांनी अहवाल टाइप केला आणि तो त्यांच्या कॅम्प ऑफिसला (सीएम) देण्यात आला.

निलेश लंके खासदार आता पारनेरचा आमदार कोण?; मविआ अन् महायुतीचं गणित काय..

मात्र जेव्हा हा अहवाल एलजी कार्यालयात गेला तेव्हा त्यावर 7  प्रश्न उपस्थित करण्यात आहे होते मात्र त्यावर कधीही चर्चा झाली नाही असं देखील सीबीआयकडून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सांगण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube