धक्कादायक ! लोकसभेला बनावट पासपोर्टने मतदान; मुंबईत एटीएसकडून चार बांगलादेशी अटकेत

  • Written By: Published:
धक्कादायक ! लोकसभेला बनावट पासपोर्टने मतदान; मुंबईत एटीएसकडून चार बांगलादेशी अटकेत

Maharashtra Fake Passport Case four bangladeshi Citizen arrested ATS: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी (angladeshi Citizen) नागरिकांनी मतदान केल्याचा आरोप ट्वीटवरून भाजप नेते किरीट सोमय्या/strong> यांनी केला होता. त्याला पुष्टी देणारी एक कारवाई दहशतवादी पथका (ATS) ने केली आहे. एटीएसच्या पथकाने चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

भावी डॉक्टरांना धक्का! NEET परीक्षेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अटक केलेल्या दोन आरोपींनी निवडणुकीत मुंबईतील जोगेश्वरी मतदान केंद्रावर मतदान केल्याचे उघडकीस आले आहे. चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यातील फारुख शेख या आरोपीला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलीय. तर तिघांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. बांगलादेश नागरिक हे गुजरामध्ये राहून बनवाट पासपोर्ट तयार करत असल्याचे उघडकीस आले. काही जण बनाव पासपोर्टवर विदेशात नोकरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

शिवराजसिंह कृषीमंत्री… शेतीत त्यांच्याएवढे ‘पॉझिटिव्ह’ काम अजून कोणालाच जमलेलं नाही…

रिजाय हुसेन शेख (वय 33) सुलतान सिद्धीक शेख (वय 54), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय 46) आणि फारूख उस्मानगणी शेख असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. रियाज शेथख हा इलेक्ट्रिशनचे काम करतो. तो अंधेरीतील मिल्लतनगर भागात राहत होता. तो बांगलादेशातील नोवाखाली येथील रहिवासी आहे. दुसरा आरोपी सुलतान शेख हा रिक्षा चालवतो. तो मुंबईत मालाड भागात राहत होता. तर तिसरा आरोपी इब्राहिम शेख हा भाजीपाला विक्री करत होता. तो माहुल गावातील म्हाडा कॉलनीत राहत होता. चौखा आरोपी फारुख उस्मानगणी शेख हा जोशेश्वरी पश्चिममधील ओशिवरा भागात राहत होता.

या चौघांविरुद्ध एटीएसने कलम 465, 468, 471, 34 आणि इंडियन पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींनी लोकसभा निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान केल्याचे आरोप आहेत.


गुजरातमधून बनावट कागदपत्रे

बनावट कागदपत्र बनवून मुंबईत राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे. परंतु ते फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे बांगलादेश नागरिक हे सूरतमधून बनावट कागदपत्रे तयार करून घेत. त्यानंतर मुंबईत ते राहत होते. फरार झालेले पाच जण हे सइदी अरेबियाला गेल्याचे समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज