Kirit Somaiya : पेंग्विननंतर ऑक्सीजन घोटाळा; किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
Kirit Somaiya On Aditya Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray)गंभीर आरोप केले आहेत. राणीबागेतील पेंग्विन घोटाळ्यानंतर (Penguin Scam)आता आदित्य ठाकरेंनी ऑक्सीजन घोटाळा (Oxygen scam)केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)जो एफआयआर दाखल केला त्याची मूळ तक्रार आपण 10 ऑगस्ट 2021 रोजी केली होती, असेही यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माध्यमांना माहिती दिली.
IAS अभिषेक सिंह यांचा पाटेकरांना इशारा, व्हिडिओ जारी करून म्हणाले, ‘युपीत याल तेव्हा…’
किरीट सोमय्या म्हणाले की, ज्याला आदित्य ठाकरे यांनी राणीबागेतील पेंग्विनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्यानंतर सर्वत्र बोंबाबोंब झाल्यानंतर म्हणजेच रोमील छेडाला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील वेगवेगळ्या 13 हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन जनरेशन प्लॅन्ट लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यांना 140 कोटींचं पेमेंट करण्यात आलं. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रोमील छेडा यांनी 140 कोटी रुपये घेतले आणि त्यांनी 38 कोटी रुपयांचेच प्लॅन्ट लावले.
Warren Buffett यांनी दान केली तब्बल 7, 250 कोटींची संपत्ती; म्हणाले माझी मुलं…
102 कोटी रुपयांचा ऑक्सीजन चोरण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी अन् त्यांचा पार्टनर रोमील छेडा यांनी केला. त्यांच्यावर आशिर्वाद हा आदित्य ठाकरेंचा होता, असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला.
सोमय्या म्हणाले की, खिचडीचोर संजय राऊत यांना मला विचारायचं आहे. कफनचोर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर द्यावं. त्याचबरोबर बायकोचे 19 बंगले चोरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, की आपण जो 100 कोटींचा ऑक्सीजन चोरला, त्यामुळे शेकडो कोवीड रुग्णांचा मृ्त्यू झाला. त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे हे घेणार का? असाही सवाल यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.
रोमील छेडा यांची छोटी-छोटी दोन चार दुकानं आहेत. त्या दुकानदाराला महापालिकेने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी 53 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट मागील पाच ते सात वर्षात दिले आहेत. त्यात पेंग्वीनपासून कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन प्लॅन्ट 13 प्लॅन्ट लावायचे होते. 38 कोटींचे दिल्लीहून सेकंडहॅन्ड प्लॅन्ट आणले. लावले आणि ते चालूच झाले नाहीत. जेव्हा ऑक्सीजनची गरज होती, त्यानंतर एक वर्षाने ते प्लॅन्ट चालू झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांना विनंती आहे की, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही मागणी यावेळी किरीट सोमय्यांनी केली.
त्याचबरोबर रोमील छेडाला कॉन्ट्रॅक्ट देणारा अधिकारी, महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची चौकशी व्हायला हवी. रोमील छेडाचं क्वालिफिकेशन काय? मातोश्रीशी संबंध म्हणून रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार मिळतो का? असाही सवाल यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.
काल मागपाडा पोलीस ठाण्यामध्ये रोमील छेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोमील छेडा गुजराती आहेत. मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि ईडीकडे या संदर्भात चौकशीसाठी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी असलम शेख हे मुंबईचे पालकमंत्री होते, असेही यावेळी किरीट सोमय्यांनी सांगितले.