Warren Buffett यांनी दान केली तब्बल 7, 250 कोटींची संपत्ती; म्हणाले माझी मुलं…
Warren Buffett : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेल्या वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी त्यांची कोट्यावधींची संपत्ती धर्मादाय संस्थेला दान केली आहे. वॉरेन बफेट हे जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणुकदार मानले जातात. तसेच ते बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख अधिकारी आहेत. त्यांचं वय 93 वर्ष आहेत. 2008 मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थनावर होते. त्यानंतर त्यांचे स्थान घसरत गेले.
दान केली तब्बल 7, 250 कोटींची संपत्ती
मंगळवारी वॉरेन बफेट यांनी घोषणा केली की, ते त्यांची तब्बल 7, 250 कोटींची संपत्ती धर्मादाय संस्थेला दान करणार आहेत. ही संपत्ती म्हणजे त्यांची गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवेचे शेअर्स आहेत. जे त्यांच्याच मुलांकडून चालवल्या जाणाऱ्या धर्मादाय संस्थेला दान करण्यात आली आहे. यामध्ये बर्कशायर हॅथवेच्या समभागांचे 2.4 मिलियन बी वर्ग शेअर्स आहेत.
सचिनची लेक अन् रश्मिका ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय
दरम्यान ह्या देणग्यांमध्ये 1.5 मिलियन शेअर्स त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या धर्मादाय संस्थेला दान करण्यात आले आहेत. तर 0.9 मिलियन शेअर्स हे त्यांच्या मुलांकडून चालवल्या जाणाऱ्या तीन धर्मादाय संस्थांना सम समान दान करण्यात आले आहेत. या दान दिल्यानंतर वॉरेन बफेट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Reshma Shinde : रेश्मा शिंदेंचा मोरपंखी साडीतील सोज्वळ लूक
या देणग्यांबद्दल सांगताना बफेट म्हणाले आहेत की, माझा आणि माझ्या मुलांचा असा विश्वास आहे की, वारसा हक्काने मिळालेली संपत्ती बाळगणे अमेरिकेत असो वा जगात असो हे कायद्याने योग्य असले तरी ते योग्य नाही. त्यामुळे ही संपत्ती दान करण्यात आली आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांची गुंतवणूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत.