भावी डॉक्टरांना धक्का! NEET परीक्षेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

भावी डॉक्टरांना धक्का! NEET परीक्षेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

NEET: वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थींनी नीट परीक्षेचा (NEET-UG 2024) निकाल रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेवर सुनावणी करतांना कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन 

NEET ही भारतातील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पदवीपूर्व स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. मात्र, या परीक्षेवर देशभरातील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ग्रेड नीट परिक्षा पुन्हा घ्यावी किंवा ग्रेड पॉइंट पद्धत रद्द करावी, अशी मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करतांना याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यासंदर्भात अहवाल मागवत ही याचिका रद्द केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात 

सुनावणी करतांना खंडपीठ म्हणाले, या याचिका कालबाह्य झाल्यामुळे निष्फळ ठरल्या आहेत. याचिकाकर्त्यांना 2024 साली झालेल्या NEET परीक्षेबाबत आणखी तक्रार असली तरी न्यायालय कालबाह्यतेमुळं त्यालाही विरोध करू शकतं.

यावर याचिकाकर्त्यांतर्फे वकील अवनी बन्सल यांनी युक्तिवाद केला की, सध्याच्या याचिका अजूनही कालबाह्य झाल्या नाहीत. कारण याचिकाकर्त्यांपैकी दोघे 23 जून रोजी होणाऱ्या NEET PG 2024 परीक्षेला बसणार आहेत.

मात्र, या प्रकरणाचा विचार करण्यास नकार देत खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्या. आम्ही ही सर्व प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवू शकत नाही, असं कोर्टाने सांगितलं.

खंडपीठाने परीक्षा प्रक्रियेच्या ‘पावित्र्या’बद्दल चिंता व्यक्त केली.
परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम झाला आहे, आम्हाला उत्तर हवे आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

दरम्यान, आरोपांनंतरही सुप्रीम कोर्टाने एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांमधील यशस्वी उमेदवारांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज