मोठी बातमी! मुंबईत GBS आजाराचा पहिला बळी; 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मोठी बातमी! मुंबईत GBS आजाराचा पहिला बळी; 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Guillain Barre Syndrome : राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे. आताही पुण्यात या आजाराने काल आणखी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईत पहिल्या (Mumbai News) रुग्णाचा बळी या आजाराने घेतला आहे. याआधी पुण्यात आठ तर सोलापुरात एक रुग्णाचा मृत्यू झाला होता. आता यादीत मुंबईचंही नाव जोडलं गेलं आहे. येथील नायर रुग्णालयात एका 53 वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

धाकधूक वाढली! GBS आजाराचा पुण्यात आणखी एक बळी; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ

राज्यात जीबीएस आजाराच्या पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 197 झाली आहे. या आजारातून बरे झालेल्या एकूण 104 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 92 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील आहेत. तसेच 40 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा, 28 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील तर आठ रुग्ण अन्य जिल्ह्यांतील आहेत.

जीबीएस संसर्गजन्य नाही

दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच अर्थात जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.

परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते. दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.

पाणी उकळून अन्‌ अन्न पूर्ण शिजवून खावं; अन्यथा, GBS चा धोका वाढतोय, डॉक्टरांनी काय सांगितल?

दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरु शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास ९५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. या रुग्णांच्या उपचारामध्ये शरिरातील प्लाझमा बदलणे, हिमोग्लोबिन वाढवणे व व्हेटींलेटर लावणे हे तीन उपचार करावे लागतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube