Maharashtra Rain Alert : पुढील तीन दिवस राज्यात पुन्हा पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ऐन दिवाळीत पावसाची शक्यता असल्याने याचा फटका अनेकांना बसणार आहे.
हवामान विभागाकडून देण्यात (Maharashtra Rain Alert) आलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम – मध्य अरब समुद्रात सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
19 ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning , light to moderate rain , gusty winds 30 -40 kmph very likely to occur at isolated places over South Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PxvBkKEaVc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 14, 2025
तर दुसरीकडे 15 ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघार घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातून मान्सून माघार घेत असल्याने काही दिवस आकाश ढगाळ राहणे आणि तुरळक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे.