Maharashtra Rain : पावसाची अवकृपा! पिकंच नाही तर जमीनही वाहुन गेली, हवामान विभागानेही धडकी भरवली…
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात शेतकऱ्यांच्या पिकेच नाही तर जमीनही वाहून गेल्याचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलंय. परतीच्या पावसाचा जोर एवढा होता की, अनेक भागांत अद्यापही पाणीच पाणी असल्याचं चित्र आहे. अशातच आता पुढील दिवसांचा हवामाना अंदाज ऐकून शेतकऱ्यांना धडकीच भरलीयं. येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडलीयं.
राज्यात येत्या येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात या काळात जोरदार पाऊस बरसणार आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण भागात पाऊस अद्यापही सुरुच असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आलीयं. मराठवाड्यात धाराशिवच्या उमरगामध्ये पावसाने उच्चांकी गाटली असून 120 मीमी पावसाची नोंद झालीयं.
डोनाल्ड ट्रम्पचा गर्भवती महिलांना अजब सल्ला! सापडला ‘वादाच्या भोवऱ्यात’; अमेरिकेत खळबळ…
राज्यात विंजासह वादळी पावसाला पोषक हवामान कायम आहे. पुढील दिवसांत मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला.
स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 चा दिमाखदार सोहळा; स्टार प्लसने साजरी केली गौरवशाली 25 वर्षे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये मंजूर…
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 2215 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं. पुढील 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ओला दुष्काळच कायय तर ज्या ठिकाी नुकसान झालंय त्या ठिकाणी पाहिजे ती मदत देणार असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीयं.
अमेरिका किंवा इस्त्राइलच्या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देऊ; इराणची अमेरिकेला थेट धमकी
दरम्यान, अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता पुढील काही दिवसांतही पाऊस पडणार असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत सापडला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.