200 कोटींची ऑफर; ‘गोकुळ घशात घालण्याचा प्रयत्न’, सतेज पाटलांचा हल्लाबोल!
Gokul Milk Union Election: गोकुळ दुध संघ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे.
Gokul Milk Union Election: गोकुळ दुध संघ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या (Gokul Milk Union) निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे. कारण माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एक गौफ्यस्फोट केला. ‘गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी मला 200 कोटींची ऑफर आली होती, मात्र शेतकऱ्यांसाठी ती ऑफर धुडकावून लावली’, असे जानकर म्हणाले.
पुणे शिक्षक, पदवीधर मतदार संघ भाजपला; चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीला ‘शिक्षक’चे तिकीट फिक्स
जानकरांच्या या दाव्यानंतर गोकुळ निवडणुकीमधील नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ‘गोकुळ कुणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. जानकर यांनी केलेल्या दाव्यामध्ये जर तथ्य असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. गोकुळ मल्टीस्टेट झाला नाही, म्हणूनच गोकुळची निवडणुक होत आहे. गोकुळ जर मल्टीस्टेट झाला असता तर गोकुळची निवडणुक कधी झाली हे दूध उत्पादकांना कळाले सुद्धा नसते’, असे सतेज पाटील म्हणाले.
‘शिवाय मुख्यमंत्र्याचा (devendra fadanvis) हस्तक्षेप गोकुळमध्ये होतोय हे आता स्पष्ट होत आहे. तत्कालीन दुग्धविकास मंत्री ऑफर मिळाल्याचा दावा करत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. गोकुळवर आलेले हे संकट थोपवायचे असेल तर समविचारी आघाडीसोबत राहावे लागेल’, असेही सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान, महादेव जानकर यांच्या 200 कोटींच्या ऑफरच्या दाव्यामुळे गोकुळच्या निवडणुकीला आता वेगळं राजकीय वळण मिळालं आहे. या दाव्यावर सतेज पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत गोकुळच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच महायुतीचे नेते 7 ऑक्टोबरला दिल्लीला जाणार असल्याचा सतेज पाटील यांचा दावा असल्याने आगामी काळात गोकुळच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.