डोनाल्ड ट्रम्पचा गर्भवती महिलांना अजब सल्ला! सापडला ‘वादाच्या भोवऱ्यात’; अमेरिकेत खळबळ…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलंय.

Donald Trump Said Tylenol Causes Autism During Pregnancy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेदरम्यान सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वेदना आणि ताप कमी करणाऱ्या टायलेनॉल औषधामुळे मुलांमध्ये ऑटिझम विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. ऑटिझम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो मुलांच्या बोलण्याच्या आणि सामाजिक संवादाच्या क्षमतेवर परिणाम करतो. ट्रम्प यांच्या विधानामुळे वैद्यकीय समुदायात खळबळ उडाली आहे, कारण टायलेनॉल गर्भवती महिलांसाठी सुरक्षित औषध मानलं जातंय.
टायलेनॉल काय आहे?
टायलेनॉल हे एसिटामिनोफेन (America) या औषधाचे ब्रँड नाव आहे आणि ताप व वेदना कमी करण्यासाठी जगभरात सर्वाधिक वापरले जाते. गर्भधारणेदरम्यान इतर वेदनाशामक औषधे जसे आयबुप्रोफेन किंवा अॅस्पिरिन धोकादायक ठरतात, त्यावेळी डॉक्टरांनी टायलेनॉलला सुरक्षित पर्याय म्हणून शिफारस केली (Donald Trump) आहे.
गर्भवती महिलांनी अॅसेटामिनोफेन (टायलेनॉल किंवा पॅरासिटेमॉल) या औषधाचा मर्यादित वापर केला पाहिजे. या औषधाचा सातत्याने वापर केल्यास होणाऱ्या बाळाला ऑटिजमचा धोका होऊ शकतो. – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प यांनी का टायलेनॉलवर टीका केली?
व्हाईट हाऊसमधून बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, एफडीए आता डॉक्टरांना इशारा देईल की टायलेनॉलचा गर्भधारणेदरम्यान वापर मुलांमध्ये ऑटिझमचा धोका वाढवू शकतो. त्यांनी असेही म्हटले की नवजात मुलांवर जास्त औषधांचा भार टाकणे योग्य नाही, तसेच लसीकरणाचे वेळापत्रक बदलावे. काही लस 12 वर्षांच्या वयापर्यंत पुढे ढकलाव्यात.
वैज्ञानिक दृष्टिकोन
सीएनएनच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ ट्रम्प यांच्या विधानाशी सहमत नाहीत. स्वीडनमध्ये 2024 मध्ये झालेल्या एका मोठ्या अभ्यासात, 20 लाख मुलांवर तपासले असता, एसिटामिनोफेनचा वापर आणि ऑटिझम यामध्ये थेट संबंध आढळला नाही. काही लहान अभ्यासात थोडा संबंध दिसला असला तरी, संशोधक याला केवळ संभाव्य संबंध मानतात. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टने ट्रम्प यांच्या विधानाला बेजबाबदार म्हटले आणि गर्भवती महिलांमध्ये अनावश्यक भीती पसरू शकते, असा इशारा दिला.
कंपनी आणि डॉक्टरांची भूमिका
टायलेनॉल तयार करणारी कंपनी अद्यापही गर्भवती महिलांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचे सांगते. कंपनीच्या मते, ताप आणि वेदना न कमी केल्यास आई आणि बाळ दोघांनाही धोका होऊ शकतो. डॉक्टर हे देखील शिफारस करतात की, गर्भधारणेदरम्यान कोणतेही औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि शक्य तितक्या कमी डोसमध्ये वापरावे.