सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा

सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा

Manoj Jarange Patil Hunger Strike Second Day : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासोबत अनेकजण उपोषणाला (Maratha Aandolak) बसलेत. काही जणांची तब्बेत खराब होत आहे. पण आता सगळ काही आनंदी असून पण आमच्यावर अन्याय का? सरकार आमचा आंत पाहत आहे, असं ते म्हणालेत.

पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस कायम; हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना

अन्यायकारी राजवट मोडणे या देशातल्या जनतेने मोडली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजासोबत दोषाच्या भावनांनी वागतंय. आज प्रजासत्ताक आहे, याच प्रजेच्या विरोधात आज सरकार वागत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil Hunger Strike) केलीय. आम्हाला न्याय पाहिजे. अन्याय अत्याचार करणारं सरकार आहे, असंच वाटतंय. आता आम्ही फक्त आरक्षणासाठी संघर्ष करत आहोत. आम्ही सरकारला आरक्षण म्हणतोय, कुणाचाही बळी मागत नाही.

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांविषयी दोष भावना निर्माण करू नये. मराठ्यांच्या लेकरांविषयी पोटात विष भरलंय. खरं काय, ते या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर येईल असं जरांगे यांनी म्हटलंय. वाल्मिक कराडवर बोलताना मनोज जरांगे यांनी आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट का दिली जाते? जर आरोपीला काहीच झालं नव्हतं, तर अॅडिमिट कशाला केलं होतं, असा सवाल विचारला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी परिधान केलेल्या फेट्याची चर्चा; काय आहेत वैशिष्ट्य?

सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा. सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे, डॉक्टर त्याच दुखत नसताना दुखत असल्याचं सांगतायत. त्यांची चौकशी करा. त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांनी षडयंत्र केलं, असा आरोप त्यांनी केलाय.

वाल्मित कराडला काहीही झालेलं नाही. सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहे. दवाखान्यात नेऊन सोडण्याचं ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, असा आरोप त्यांनी केलाय. जर हे आरोपी सुटले, तर याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube