Download App

Roshni Shinde : ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी; पण ‘हे’ नियम पाळावे लागतील

  • Written By: Last Updated:

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी शिंदे गटाच्या काही कार्यक्रत्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटाला लक्ष्य केलं जात आहे. काल उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांनी सरकारवर आक्रमकपणे टीका केली.

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

याच प्रकरणात निषेध म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थी घालून परवानगी दिली आहे. ठाण्यातील मोर्चाला दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

पोलिसांनी घातलेल्या अटी

ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी अटी सदर कार्यक्रम दिलेल्या वेळी तारखेस व ठिकाणी सुरू करून मुदतीत संपवण्यात यावा.

कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता पार पाडण्यात यावा.

कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शित करू नये.

गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…

आक्षेपार्ह, प्रक्षोभक, अगर कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करू नयेत

आक्षेपार्य प्रक्षोभक गाणी गाऊ नयेत अथवा वाजवु नयेत.

व्यक्ती, प्रेत, किंवा आकृत्या त्यांच्या प्रतीमा त्यांचे प्रदर्शन करणे किंवा जाळणे अशी कृत्य करू नये.

सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोणताही प्रकारे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवून शांततेस बाधा पोहचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

Tags

follow us