ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत 1992 सारख्या दंगलीचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राणे कुटुंबिय आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आमदार राणेंनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राणेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली आहे.
एकनाथ शिंदे राजीनामा देणार?; फडणवीस म्हणतात मूर्खांचा बाजार
आमदार नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी 22 ऑगस्ट 2004 साली एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये मुंबईत 1992 सारखी दंगल पुन्हा घडवायची असल्याचं ते म्हणाले होते. दक्षिण मुंबईतल्या मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करा, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते.
Kiran Mane: ‘तर मी दुकानाचं शटर ओढलं’, लेकीसाठी किरण मानेंची खास पोस्ट…
तसेच मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले केल्यानंतर दंगली उसळतील. ही दंगल भडकावण्याची जबाबदारी माझी असेल, असं उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं असल्याचं नितेश राणेंकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आताही राज्यात दंगली घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर, मालेगावात दंगल उसळली होती. त्या दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का? याचा तपास राज्याच्या गृह विभागाने करण्याची मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली आहे.
NEET Exam: सांगलीत परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे
आमदार नितेश राणेंकडून याआधीही ठाकरे कुटुंबियांवर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार असून पण त्याआधीच ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्यांच्या या आरोपांची खिल्ली उडवलीय.
आमदार दानवे म्हणाले, भाजपचे आमदार नितेश राणे हे 2004 साली किती वर्षांचे होते. लहानच होते ना… अशा बालिश नितेश राणेंवर मी बोलत नाही, या शब्दांत त्यांनी नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे.