Download App

Thackeray Vs Shinde : शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा आमचा निर्णय योग्यच, निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात दावा

  • Written By: Last Updated:

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाला आज आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने आयोगाला उत्तर मागितले होते.

निवडणूक आयोगाने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. आयोगाने म्हटले आहे की, हा विचार करून घेतलेला निर्णय आहे. निर्णय देण्यापूर्वी ठाकरे गटाने  मांडलेले सर्व मुद्देही आम्ही ऐकून आणि समजून घेतले आहेत.

यासोबत निवडणूक आयोगाचे म्हटले आहे की आयोगाने आपल्या अधिकाराच्या कक्षेत म्हणजेच अर्ध-न्यायिक क्षमतेत निर्णय दिलेला होता.

Tags

follow us