Download App

ती बोली भाषा, तस म्हणायचं नव्हतं, विपर्यास केला; ‘त्या’ वक्तव्यावर कृषीमंत्री दत्ता भरणेंनी दिलं स्पष्टीकरण

Datta Bharne यांनी कृषी खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

That dialect was not meant to be spoken, it was distorted; Agriculture Minister Datta Bharne gave clarification : वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचं कृषी खातं काढून मंत्री दत्तामामा भरणे यांना देण्यात आलं. खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Sanskruti Balgude : संस्कृतीचं पिस्ता रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, चाहते फिदा…

काय म्हणाले दत्ता मामा भरणे?

तुम्ही ते भाषण सगळं ऐका, वाकडं काम सरळ काम, मी अधिकाऱ्यांना सांगत होतो. सर्व सामान्य माणूस आपल्या घरचा माणूस असल्या सारखं वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तव्य मी केलं होतं. पण त्याचा विपर्यास केला गेला. ती माझी बोली भाषा होती. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. व्हिडिओ पहिला तर लोकांनी खूप टाळ्या वाजवून दाद देखील दिली होती.

कुछ़ बड़ा होने वाला हैं! एकाच दिवशी शाह-मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा; भेटीनंतर 5 ऑगस्ट तारीख चर्चेत

काय म्हणाले होते मंत्री भरणे?

वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचं कृषी खातं काढून मंत्री दत्तामामा भरणे यांना देण्यात आलं. खात्याची जबाबदारी हाती घेताच भरणे मामांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. एका कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करुन परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.

अहिल्यानगर – पुणे प्रवास होणार अवघ्या अडीच तासांत, कसं ते जाणून घ्या?

मंत्री छगन भुजबळांनी भरणेंच्या वक्तव्याचा अर्थ सांगितला…

मंत्री भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कृषिमंत्री भरणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, की वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो असं माझं म्हणणं आहे. मंत्र्यांकडे लोक केव्हा येतात? काही अडचणी असतील तेव्हाच येतात. अधिकाऱ्यांकडे न्याय मिळत तेव्हाच मंत्र्यांकडे लोक येतात. कधी कधी उगाचच नियमांचा किस काढला जातो. त्यामुळे काही काम होत नाही. आपण जर लोकांची कामं केली तर लोक आठवणी ठेवतात असं त्यांना म्हणायचं असेल. प्रत्येक वेळी तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ घेत जाऊ नका. कधी कधी अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होतात तेव्हा त्या निर्णयात मंत्री, वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊन काम मार्गी लावतात.

follow us