मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, खा. संजय राऊत यासारख्या अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हणतं विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. अशातच आता खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गॅंगस्टर टोळीच्या नावाने राऊतांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयतिला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली. दरम्यान, राऊत धमकी प्रकरणातील आरोपीचा कुठलाही गॅंगशी संबध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
खा. राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आली. दिल्लीत आल्यावर एके 47 ने उडवून देणार असल्याचं धमकी देणाऱ्याने म्हटलं होतं. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने राऊतांना धमकी दिल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राऊत यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली. दरम्यान, या धमकी प्रकरणात पोलिसांनी राहुल तळेकर (रा. वडगाव शेरी) या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं.
Maharashtra Politics : अनिल देशमुखांसह शरद पवार नितीन गडकरींच्या दाखल, राजकीय चर्चांना उधाण
पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत खराडी चंदननगर परिसरातून एका हॉटेलमधून तळेकर याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली आहे. या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईशी आरोपीशी नेमका काय संबंध आहे? याचीही पोलिसांनी चौकशी केली. मात्र, राहुल तळेकर या आरोपीचा कुठल्याही गॅंगशी संबंध नसल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी राहुल तळेकर हा 23 वर्षाचा असून त्याचा कुठल्याही गॅंगशी संबंध नाही. आरोपी यांचं कुठलंही क्रिमिनिल रेकॉर्ड नाही. त्याने फक्त लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्याने काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ पाहिला होता. लॉरेन्सचा व्हिडिओ पाहून आरोपी तळेकर यांने राऊत यांना धमकी दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.