वंचित आणि काँग्रेसच्या युतीमुळे भाजप व मित्रपक्षांत भीती; वंचितच्या प्रवक्त्या रुपवते यांचं वक्तव्य

भाजप आणि त्याचे मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्या युतीमुळे घाबरले आहेत; दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवतील.

Untitled Design   2026 01 02T181036.324

Untitled Design 2026 01 02T181036.324

deprived and Congress has created an atmosphere of fear : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे. नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय आहे. मीडियामधून सांगण्यात येत आहे की नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये, तसेच दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.भाजप आणि त्याचे मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडी(VBA) व काँग्रेस(Congress) यांच्या युतीमुळे घाबरले आहेत. हे दोन्ही पक्ष मुंबई(Mumbai) महानगरपालिकेत सत्ता मिळवतील, ही भीती त्यांना वाटत आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सर्व समूहांना एकत्र करून हा विजय महत्त्वाचा असणार आहे. नेते व कार्यकर्त्यांनी कोणत्याही चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती मुंबईत भक्कम आहे. एकत्रित ताकदीने ही निवडणूक लढवली जाणार आहे.

अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचं बिनविरोध सत्र; पनवेलमध्ये 7 जण बिनविरोध, रविंद्र चव्हाणांची जादू चालली

आता उरलेल्या 15 दिवसांत कार्यकर्त्यांनी आपला वॉर्ड व आपला बूथ सांभाळावा आणि वंचित बहुजन आघाडीचा विजयाचा झेंडा महानगरपालिकांमध्ये फडकवावा. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी केलं आहे.

Exit mobile version