Chargesheet filed in santosh Deshmukh murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सीआयडीने (CID) तपासात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागणे, आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण आणि संतोष देशमुख (Deshmukh) हत्या या प्रकरणात चौदाशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मुख्य सूत्रधार असल्याचे दोषारोपपत्र म्हटले आहे. अवादा कंपनीकडून दोन कोटीची खंडणी मिळण्यात सरपंच संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते. त्यातून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे यांच्यासह आठ जणांनी ही हत्या घडवून आणल्याचा दोषारोपपत्र म्हटले आहे.
सरपंच तुला बघून घेवू, तुला जिवंत सोडणार नाही; खंडणी न दिल्याचा प्रचंड राग
पवन ऊर्जाचा विद्युत प्रकल्प उभारणारी अवादा एनर्जी कंपनीही मस्साजोग येथे प्रकल्प उभारत होती. हा प्रकल्प सुमारे तीनशे कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षी आठ ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराड व अवदा एनर्जीचे अधिकारी शिवाजी थोपटे हे परळीत भेटले होते. त्यावेळी विष्णू चाटे हजर होते. कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाही तर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीची अवदा कंपनीची सर्व कामे बंद करा, अशी धमकी दिली. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवर अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला होता. कंपनीची काम बंद करा, काम चालू कराल तर यादा राखा, अशी धमकी दिली होती. त्यानंतर दुपारी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत गेला. वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण कर आणि वाल्मिक भेट घ्या आणि तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली होती.
Video : देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार कराडच; आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले
त्याचदिवशी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याचे केज येथील कार्यालयात बैठक झाली. दोन कोटी रुपये खंडणी देत नसले तर काय करावे लागले याची चर्चा झाली. त्यावेळी प्रतिक घुले, सुधीर सांगळे, आणि कृष्णा आंधळे हे सहभागी झाले. कंपनीने खंडणी न दिल्याने 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतिक व सुधीर घुले हे अवादा कंपनीच्या प्रोजेक्टवर गेले. तेथे सुरक्षा रक्षकाला मारहाण केली तसेच खंडणी मागितली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना बोलवून घेतले. त्यावेळी देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदाराला विनंती केली. कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, असे सांगितले. त्यावेळी सुदर्शन घुले याने संतोष देशमुखांना धमकी दिली. सरपंच तुला बघून घेवू, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
विष्णू चाटेंचा वारंवार फोन
त्यानंतर विष्णू चाटे हा वारंवारह संतोष देशमुख यांना फोन करून खंडणीत आड येवू नको, वाल्मिक अण्णा तूला जिवे सोडणार नाही, अशी धमकी देत होता. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले व वाल्मिक कराडमध्ये कॉल झाला. कराडने घुलेला सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, आता जो कोणी येईल, त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा, विष्णू चाटेला बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल.
तिरंगा हॉटेलवर हत्येचा कट रचला
आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे, सुदर्शन घुले व गोपनीय साक्षीदार हे नांदुर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मीक कराडचा निरोप दिला की, संतोष देशमुख हा आडवा आला तर कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केटार यांनी सरपंच देशमुख यांचे उमरी टोलनाका येथून एका गाडीतून अपहरण केले. प्लॅस्टिकचा पाईप, लोखंडी राड, गॅस पाइप आणि क्लचवायर आणि काठीचा वापर करून देशमुख यांचा खुन केला. मृतदेह दैठणा फाटा येथून टाकून आरोपी फळून गेला. आरोपी विष्णू चाटे याने महत्त्वाचा पुरावा असणाऱ्या मोबाइल फोन हा नष्ट केला आहे.