Download App

विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढं सरकार झुकलं.., काँग्रेस प्रवक्त्याकडून निर्णयाचं स्वागत

मुंबई : राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढं अखेर सरकार झुकलं असून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णयाचं स्वागत करत असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटंलय.

तसेच भाजपच्या नेत्यांनी यांच फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अनेक दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश मिळालं असून काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या या मागणीला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हंटलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत यासंदर्भात सरकारला विनंती केली होती. पण सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेत निर्णय घेण्याचे टाळले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्यानंतर १३ जानेवारी रोजी काँग्रेसच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांसह संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले होते. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात हजारो विद्यार्थ्यांसह सकाळी १० वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मी स्वतः आंदोलन केलं असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

त्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पुणे शहरात होते पण त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची साधी भेटही घेतली नाही. त्यानंतरही राज्यभरात विद्यार्थी आक्रमक होऊन आंदोलन करत होते. मी स्वतः पाठपुरावा करून विधानरिषद उपसभापती निलमताई गो-हे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केल्याचं म्हटंलय.

दरम्यान, अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. पण या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आमदार अभिमन्यू पवार, आमदार गोपीचंद पडळकर यांना पुढे करून निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करायला लावल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय.

Tags

follow us