भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार वर्गिकरण केलं आहे.

News Photo   2026 04 13T182759.269

भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर केला आहे. म्हणजे देशात सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो.

दरम्यान, महाराष्ट्रात यावर्षी किती पाऊस असणार याबाबतचा अंदाज देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील चिंता वाढणार आहे. कारण भारतीय हवामान विभागानं आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सामान्यपैक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गरज असेल तरच दुपारी 12 नंतर घराबाहेर पडा; हवामान विभागाने का केलं असं आवाहन?

कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ सगळीकडे सामन्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे. म्हणजे सरासरीच्या 90 ते 95 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे.

एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळं एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

Exit mobile version