Mansoon : अडकलेल्या ‘मान्सून’ची तारीख ठरली! शेतकऱ्यांनो चिंता सोडा, पेरणीला लागा…

राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सून वारे पुढे सरकतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain

Mansoon : जून महिन्याचा मध्य उलटला तरीही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra Mansoon) पत्ता नाहीये. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. मान्सून दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 8 जूनला दाखल झाला परंतू मान्सून वाऱ्याची गती मंदावल्याने मान्सून अडकलायं. पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त केलायं जातोयं, परंतू त्याच ठिकाणी मान्सून वारे अडकणार असल्याचीही शक्यता आहे. मान्सून वारे नेमके कुठे अडकलेत आपण थेट भारतीय हवामान विभागाच्या नवा अंदाज पाहुयात.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 ते 10 जूनदरम्यान, तळकोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला होता. परंतू उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्यानं मान्सूनचे वारे पुढे सरकण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे आता पुढील 5 दिवसांनंतर ही परिस्थिती बदलू शकते, मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलायं.

मान्सूनने सध्या आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा ओडिसा, झारखंड बिहारपर्यंत मजल मारलीयं. मोसमी वारे सध्या हरनाई, सोलापूर भागांतून पुढे सरकत असून पूर्व सागरी क्षेत्रासह हैद्राबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबणी, रांची, जमुई, मुझफ्फरपूर या मुख्य ठिकाणांवरुन पुढे सरकत आहेत.

कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो

पुढील 4 ते 5 दिवसांत नैऋत्य मोसमी वारे देशांतील अनेक राज्यांत वाहणार असून यामध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामान पूरक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लवकरच पोहोचण्यासाठी वातावरण अनूकुल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.

दरम्यान, मान्सूनचा प्रवास पाहता देशातील आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस आणि मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाच्या या गतीमुळं पुढील आठवड्यात राज्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

follow us