केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचा भाऊ ठरला सिया-चेतनच्या ओळखीचा दुवा, तपासातून महत्वाची माहिती समोर

मागील सहा महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल्स झाले असून त्यांनी एकूण 238 तासांपेक्षा अधिक संवाद साधला.

Untitled Design 59

Untitled Design 59

The link connecting Siya and Chetan : पुण्यातील हायप्रोफाईल केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती दररोज नवे धागेदोरे लागत आहेत. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंध, त्यांच्या संपर्काचा कालावधी आणि हत्येपूर्वीच्या हालचालींबाबत महत्वाचे पुरावे समोर येत आहेत. तपासादरम्यान दोघांमधील ओळखीचा दुवा सियाचा मोठा भाऊ साहिल गोयल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, चेतन चौधरी आणि साहिल गोयल यांची मैत्री क्रिकेटच्या मैदानावर झाली होती. दोघांनी अनेक क्रिकेट सामने एकत्र खेळले होते. सिया गोयल देखील साहिलसोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात असे. याच माध्यमातून सिया आणि चेतन यांची ओळख झाली. दिवाळी 2025 मधील एका पार्टीत दोघांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील संपर्क अधिक वाढत गेला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल्स झाले असून त्यांनी एकूण 238 तासांपेक्षा अधिक संवाद साधला. या कॉल रेकॉर्ड्समुळे दोघांमधील घनिष्ठ संपर्क स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लोणावळा विभागाचे पोलीस उपाधीक्षक गजानन टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींची भूमिका आता अधिक स्पष्ट होत आहे. याशिवाय सियाचा भाऊ साहिल आणि तिच्या इतर नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

संघाची स्तुती करायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी टोचले विश्वास नांगरे पाटील यांचे कान

दरम्यान, केतन अग्रवालच्या हत्येनंतर आरोपींनी आपल्या मोबाईलमधील व्हाट्सअप चॅट, इन्स्टाग्राम मेसेज आणि कॉल डिटेल्स दिलीत केल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर संबंधित डेटा मोबाईलच्या रिसायकल बिनमधून देखील हटवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात असून त्यातून आणखी महत्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास अधिकाऱ्यांचा प्राथमिक संशय असा आहे की, लोहगडला जाण्यापूर्वीच दोघांनी मोबाईलमधील चॅट्स दिलीत केले असावेत. या संशयाची पडताळणी करण्यासाठी डिजीटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. केतन अग्रवालच्या हत्येच्या आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी एका कॅफेमध्ये जवळपास एक तास एकत्र बसले होते. त्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हत्येचा कट त्याच वेळी रचला गेला का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीची तपासणी सुरू केली आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील संपूर्ण कट उलगडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

Exit mobile version