शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; महाटीईटीची परीक्षा आता नव्या तारखेला

राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.

Untitled Design 30 1

Untitled Design 30 1

The MahaTET exam will now be held on a new date : राज्यातील लाखो शिक्षक भरती इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी 2026 परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. पूर्वनियोजित 21 जूनऐवजी आता ही परीक्षा 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांची केंद्रे मोठ्या प्रमाणात एकच असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी नीट 2026 परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याने परीक्षा केंद्रांवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात महाटीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकचे आयजी बदलले, कृ्ष्ण प्रकाश, लखमी गौतम, मनोज शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य परीक्षा परिषदेनं यापूर्वी महाटीईटी परीक्षा 21 जून रोजी घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र नीट परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेक परीक्षा केंद्रे, मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था यांच्यावर ताण येणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी परिषदेनं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं.

सुधारित वेळापत्रकानुसार आता महाटीईटी परीक्षा 28 जून रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना तपासत राहाव्यात. काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात पुन्हा बदल होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजितदादा अडचणीत असताना नाही पण तटकरेंसाठी.., शेळकेंच्या वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार

महाटीईटी परीक्षेचं प्रवेशपत्र 16 जूनपासून ऑनलाइन उपलब्ध होणार असून उमेदवारांना 28 जूनपर्यंत ते डाउनलोड आणि प्रिंट करता येणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होईल, तर दुसरा पेपर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे. पेपर एक हा इयत्ता पहिली ते पाचवी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता परीक्षा मानली जाते, तर पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असतो. अनेक उमेदवार दोन्ही पेपर देत असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात झालेला बदल त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी पोहोचणे, प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र बाळगणे आणि परिषदेनं जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

महाटीईटीसंदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आणि पुढील सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

वेबसाईट :
mahatet.in

Exit mobile version