Waqf Board: सरकारचा मोठा निर्णय! वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर

शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी

Waqf Board: सरकारचा मोठा निर्णय! वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर

Waqf Board: सरकारचा मोठा निर्णय! वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर

Mahyuti Government Announced Fund for Waqf Board : राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान, महायुती सरकारमधील प्रमुख सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच, वक्फ बोर्डावर अनेक भाजप नेते टीका करताना दिसत होते. मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती सरकारने तातडीने वक्फ बोर्डाचं कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी मंजूर करून निर्णायक पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला.. महायुतीच्या बैठकीत CM ठरला?

शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर, आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये सरकारही स्थापन होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. दरम्यान, इकडे मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्यापूर्वी किंवा सरकार स्थापन होण्यापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वक्फ बोर्डाला हा निधी देण्यात येत आहे.

Exit mobile version