Jitendra Awhad : ‘मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा डाव’

Jitendra Awhad : मुस्लिम समाजानंतर आता ख्रिश्चन समाजाच्या जमीनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलाय. नुकताच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मोहोर उमटली. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप सरकारवर केलायं.
जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर , आई किम फर्नांडिसने घेतला जगाचा निरोप
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रामध्ये ख्रिश्चन धर्मियांकडील जमीनीचा मुद्दा उचलला आहे. ही जमीन वक्फपेक्षाा अधिक असल्याचे सदरील अंकांतील लेखामध्ये नमूद करण्यात आले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मुस्लिम समाजानंतर ख्रिश्चन समाजाच्या जमीनी हडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आव्हाडांनी केलायं.
संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा
वक्फ विधेयकात आहे तरी काय? कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान?
ऑगस्ट 2024 मध्ये दोन वक्फ विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली होती. वक्फ बोर्डाचे कामकाज सुव्यवस्थित करणे आणि वक्फ संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करणे हा उद्देश यामागे आहे. वक्फ संशोधन विधेयक 2024 चा उद्देश वक्फ अधिनियम 1995 मध्ये संशोधन करणे असा आहे. जेणेकरून वक्फ संपत्तीचे रेग्युलेशन आणि व्यवस्थापनात येणाऱ्या समस्या सोडवता येतील.
भारतात सध्या वक्फ संपत्तीचे प्रशासन वक्फ अधिनियम 1995 नुसार केले जाते. केंद्रीय वक्फ परिषद सरकार आणि राज्य वक्फ बोर्डाला धोरणांसंदर्भात मार्गदर्शन करते. परंतु, वक्फ संपत्तींना थेट नियंत्रित करत नाही. राज्य वक्फ बोर्ड प्रत्येक राज्यातील वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम करते. वक्फ ट्रिब्यूनल विशेष न्यायिक विभाग वक्फ संपत्तीशी संबंधित वादांची जबाबदारी सांभाळतो.