जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर , आई किम फर्नांडिसने घेतला जगाचा निरोप

Jacqueline Fernandez : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) घरी शोककळा पसरली आहे. जॅकलिनची आई किम फर्नांडिस (Kim Fernandez) यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, किम फर्नांडिस यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होता.
काही रिपोर्ट्सनुसार, 24 मार्च रोजी मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या 13 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र अद्याप अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्याकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, 26 मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात जॅकलिन फर्नांडिस परफॉर्म करणार होती मात्र आईच्या प्रकृतीमुळे तिने या कार्यक्रमात परफॉर्म केले नाही.
खावटीवरून वाद अन् नाशिकमध्ये ननंद -भावजईची फ्री स्टाईल हाणामारी
जॅकलिन बॉलिवूडमध्ये 2009 मध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव अलादीन होते. या चित्रपटात जॅकलिनसोबत रितेश देशमुख दिसला होता. जॅकलिनने हाऊसफुल 2, मर्डर 2, किक, ब्रदर्स, ढिशूम आणि जुडवा 2 सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अलिकडेच ती सोनू सूदच्या फतेह या चित्रपटातही दिसली.