पुणे महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक (Election) लांबणीवर पडली आहे. महापौर पदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. महापौर पदासाठी निवडणूक जानेवारी अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची तारीख समोर आली आहे. त्यानुसार 6 फेब्रुवारील महापौर पदाची निवडणूक होईल.
महापालिकेने विभागीय आयुक्तांना महापौर निवडी प्रक्रियेसंदर्भात पत्र पाठवले होते. त्यामुळे 26 जानेवारीनंतर दोन दिवसात ही प्रक्रिया राबवून महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाईल, असे बोलले जात होते. मात्र, विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे.
Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास
नव्या महापौराच्या स्वागतासाठी पुण्यातील महापौर बंगला नव्या सज्ज होत आहे. राज्यात 2022 नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे नवा महापौरही नाही. त्यामुळे आता नव्या महापौरासाठी या बंगल्यात रंगकाम अन् फर्निचरचं काम सुरु करण्यात आलं आहे. या बंगल्यानं पुणं बदलताना पाहिलंय.
अनेक नवे निर्णय स्विकारताना पाहिलंय. पुण्याच्या बदलत्या रुपाचा हा बंगला साक्षीदार आहे, कारण अनेक महत्वाचे निर्णय सर्वात आधी याच बंगल्यात विचारासाठी घेतले गेले आहेत. पुण्यात यंदा महिला राज असणार आहे. महापौर पद कोणाला मिळेल, पुण्यात देवेंद्र फडणवीस कोणत्या लाडक्या बहिणीला संधी देतात हे काही दिवसांत स्पष्ट होईल आणि पुन्हा एकदा धामधुमीत नवा महापौर या बंगल्यात वास्तव्यास येईल.
पक्षनिहाय संख्याबळ
एकूण जागा १६५
भाजप- ११९
शिवसेना -०
ऊबाठा-१
राष्ट्रवादी शरद पवार -३
राष्ट्रवादी अजित पवार -२७
काँग्रेस -१५
एमआयएम-०
अपक्ष-०
इतर -०
