पुण्यातील प्रभाग क्र. 9 मधील अटीतटीच्या लढतीत अमोल बालवडकरांचा लहू बालवडकरांना धोबीपछाड

पुण्याच्या प्रभाग क्र. 9 मधील पक्षीय नव्हे, तर प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या लढतीत लहू बालवडकरांनी अमोल बालवडकरांना शह दिला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (271)

Amol Balwadkar beats Lahu Balwadkar in a washout : प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक लढतीकडे शहरासह राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागून राहिलं होतं. अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर या एकाच आडनावाच्या दोन उमेदवारांमधील ही लढत केवळ पक्षीय नव्हे, तर प्रतिष्ठेचीही मानली जात होती. त्यामुळे नेमका कोणता बालवडकर बाजी मारणार, याबाबत सकाळपासूनच मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू  बालवडकर यांनी आघाडी घेतल्याचं चित्र होतं. मात्र पुढील फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी मतांची घसघशीत आघाडी घेतली आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा संघर्ष सुरू राहिला असला, तरी अखेरीस अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकरांचा पराभव करत विजय निश्चित केला.

BMC Election : मुंबईत नवीन ट्विस्ट, काँग्रेस ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत तर ठाकरे बंधूंचा कमबॅक

या निकालामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपला मोठं यश मिळालं असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे. एकाच आडनावाच्या उमेदवारांमधील या चुरशीच्या लढतीने मतदारांमध्येही चर्चा रंगवली होती. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर राष्ट्रवादीच्या गोटात निराशा पसरली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.

follow us