Maharashtra Rain Update : पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार (Rain) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, मुंबईप्रमाणेच पालघर ठाणे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Video : गुजरातची सुंदरी ठरली इंडिया मिस युनिव्हर्स; आनंद व्यक्त करताना काय म्हणाली रिया सिंघा?
उकाड्यापासून दिलासा
राज्यात आजपासूनच मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वातावरणात वाढलेली आर्द्रता तसंच, मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असल्याने मुंबईकर आधीच उकाड्याने हैराण झालेत. मागील दोन दिवस कमाल तापमानातही वाढ झालीय, मात्र आता पुढील आठवड्यात अपेक्षित पावसानंतर तापमानात काही अंशी घसरण होण्याची तसंच उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितलं आहे.
नगरकरांनो सावध राहा ! सलग चार दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील 4-5 दिवसात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कालची स्थिती पाहता मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.