Download App

उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा वाढला…

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज (१६ एप्रिल) गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुरुवातीला सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा मृतांचा आकडा 13 वर गेला आहे.

खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना जातीनिहाय करा, अन….

सोहळ्याला उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने आत्तापर्यंत 13 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काल रात्री आठच्या सुमारास आले होते.

श्री सदस्यांच्या जाण्यानं माझे मन जड झाले आहे; महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर शाहांचं ट्वीट

मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच

दरम्यान, या सोहळ्याला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप-शिंदे गटाचे अनेक आमदार खासदार उपस्थित होते. मात्र, खारघरमधील मैदानात सुरु असलेल्या कार्यक्रमात येणाऱ्या श्री सदस्यांसाठी भर उन्हात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम साधारणपणे सकाळी 11 : 30 पर्यंत पार पडला असेल पण त्यानंतर अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी भर उन्हात श्री सदस्य मान्यवरांची भाषणे ऐकत होती. त्यामुळेच नागरिकांना उष्माघाताच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने आत्तापर्यंत जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Tags

follow us