Download App

वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पाय खोलात; थेट पीएमोने घेतली दखल, अहवाल पाठवण्याचे आदेश

वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची थेट पीएमओ कार्यालयाने दखल घेतली आहे. त्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत.

  • Written By: Last Updated:

 IAS Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची आता थेट पीएमओ ऑफिसने दखल घेतली आहे. प्रक्षिणार्थी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणं असे प्रकार (Pooja Khedkar ) पूजा खेडकर यांनी केले होते. या सर्व प्रकरणांची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. दरम्यान, पीएमओने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील सर्व अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. (Manorama Khedkar)पुजा खेडकर यांना यूपीएससी परीक्षेत मुलाखतीत महाराष्ट्रासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं देता आली नव्हती. तसंच, या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेलं क्रिमिलेअर प्रमाणपत्र या सर्व प्रकाराची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. त्याची दखल आता पीएमओने घेतली आहे.

चौकशी होणार    नॉन-क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र कसं मिळालं? पूजा खेडकरच्या वडिलांचा मोठा दावा, म्हणाले

पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवावा असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशिबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी ओबीसी भटक्या जमाती ३ या कोट्यातून प्रवेश घेतला. विशेष म्हणजे वडील आयएएस अधिकारी असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र या प्रवेशासाठी त्यांनी जोडलं. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख होती. त्यामुळे याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

अपंगत्व कधी आलं? Pooja Khedkar :माझ्या मुलीला विनाकारण पूजा खेडकरच्या वडिलांचा दावा नेमका काय?

पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं. त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली. परंतु, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलं नाही. मग यूपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आल होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचा बोर्ड लावला. तसंच त्या गाडीला अंबर दिवा लावला. यासह विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तो दंड त्यांनी आता भरला आहे.

follow us