Download App

महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला; राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची टीका

  • Written By: Last Updated:

Dr. Fauzia Khan on Women’s reservation bill : केंद्र सरकारने मांडलेले ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ (Women’s reservation bill ) आज लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, नारी शक्ती वंदन विधेयकावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान (Dr. Fauzia Khan) यांनी भाजपवर टीका केली. महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली.

17 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी महिला आरक्षणाची मागणी केली होती. अखेर 18 सप्टेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले. काल आणि आज चर्चेनंतर बहुमताने तो मंजूर करण्यात आला आहे. याविषयी बोलतांना डॉ. फौजिया खान म्हणाल्या की, मागील २७ वर्षापासून अडगळीत पडेलेले आहे. महिला आरक्षण विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते तर त्यामागे स्वच्छ हेतू आहे, असं म्हणता आले असते. भाजपचा हेतू स्पष्ट असता, तर त्यांनी नऊ वर्षांपूर्वीच हे विधेयक आणले असते आणि आतापर्यंत त्याची अंमलबजावणीही केली असती. मात्र, आता आणलेले महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला आहे, असं त्या म्हणाल्या.

भाजपने निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले आहे. असे असले तरी आम्ही त्यासाठी संपूर्ण सहकार्य करू, असं त्या म्हणाल्या.

IND vs AUS : मोहालीत ऑस्ट्रेलियाची बादशाहात, टीम इंडियाच्या नावावर आहे नकोसा रेकॉर्ड 

ऐतिहासिक संसद भवनातून नवीन इमारतीत प्रवेश करताना राष्ट्रपतीपदी महिला असताना त्यांना संधी द्यायला हवी होती. पण भाजपने त्यांना डावलले, हे अतिशय खेदजनक आहे. संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देताना राज्यघटनेची प्रत सरकारतर्फे सर्व सदस्यांना देण्यात आली. त्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्दच नाहीत. मागच्या दाराने देशाची घटना बदलण्याचा हा भाजपचा डाव आहे. याबाबत न्यायालयात तक्रार दाखल करावी, असेही फौजिया खान म्हणाल्या.

दरम्यान, हे विधयेक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. आता हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

 

Tags

follow us