IND vs AUS : मोहालीत ऑस्ट्रेलियाची बादशाहात, टीम इंडियाच्या नावावर आहे नकोसा रेकॉर्ड
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. विश्वचषकापूर्वी (World Cup 2023) भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते. पण मोहालीत (Mohali) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वनडेमध्ये पराभूत करू शकलेला नाही. या मैदानावर कांगारूंनी वनडेमध्ये टीम इंडियाला प्रत्येक वेळी पराभूत केले आहे.
मोहालीत ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का?
मोहालीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतीय संघासाठी सोपे नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, भारतीय संघाला मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड सुधारायची संधी आहे. शुक्रवारी होण्याऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करण्यात भारतीय संघ यशस्वी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
भारतीय खेळपट्टींवर कोणाची बादशहात?
वनडे फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे.
Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर
याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर 67 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला आपल्या भूमीवर 30 वेळा पराभूत करण्यात यश मिळवले आहे.
पहिल्या दोन वनडेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा , प्रसिध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
कोल्हापुरकरांच्या आनंदावर विरझण! सबसे कातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
तिसऱ्या वनडेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.