कोल्हापुरकरांच्या आनंदावर विरझण! सबसे कातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमांची क्रेझ अजून देखील संपली नाही. गौतमी पाटील म्हणजे पैसा वसूल, गौतमी पाटील म्हणजे (Social media) राडा हे समीकरण जणू आता राज्यात ठरला आहे. (dance) महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम झाला आहे. सध्या तिच्या तारखा मिळणं देखील खूपच मुश्किल होतं आहे. कोल्हापूरकरांना (kolhapur Police) कशा तरी तिच्या तारखा मिळाले होते. परंतु पोलिसांनी तिचे कार्यक्रम थेट रद्द केल्याचे समोर आले आहे. यामुळे गौतमीसह तिच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे.
गणेशोत्सव काळात कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. गौतमी पाटीलचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मनोरंजन विभाग आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. सध्या गणेशोत्सव काळात पोलिसांवर असलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देता येणार नसल्याचे कारण पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे गौतमीचे २२ आणि २४ सप्टेंबर दिवशी कोल्हापूरच्या ग्रामीण भागात होणारे हे कार्यक्रम आता होणार नाही. या कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याची माहिती आता कोल्हापूरच्या अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी दिली आहे.
View this post on Instagram
सध्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सुरु आहे. सणासुदीचा काळ असल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. यामुळे उत्सव काळात उत्सवाखेरीज इतर कोणत्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देणं शक्य नाही, असं कारण पोलिसांनी यावेळी दिलं आहे. यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना आता कोल्हापूरकरांना मुकावं करावा आहे.
Boys 4: ‘बॅाईज ४’मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
तसेच सणासुदीच्या काळामध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. तिच्या कार्यक्रमाला देखील मोठी गर्दी होत असल्याने आयोजक गौतमीला आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि गावात बोलावण्यावर भर देत असतात. परंतु सणासुदीत पोलिसांकडे बंदोबस्तांचं काम असतं. यामुळे पोलीस कोणत्याही इतर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही. यामुळे गाण्याच्या आणि स्टेज कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त पुरवला जाणार नसल्याचे यावेळी कोल्हापुर पोलिसांनी सांगितले आहे.