Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर

Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. विरोधात मतदान करणारे दोन खासदार कोण अशी चर्चा सुरु होती, आता या दोन्ही खासदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश आहे. त्यांनी विरोधात मतदान का केलं? या त्यांनी भूमिका मांडली आहे.

नारी शक्ती वंदन कायदा विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील हे ओबीसी आणि मुस्लिम समाजातील महिलांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे.

असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
ओवैसी यांनी सभागृहात सांगितले की, सरकारला केवळ सवर्ण महिलांचे संसदेत प्रतिनिधित्व वाढवायचे आहे. ओबीसी आणि मुस्लिम समाजातील महिलांची चिंता नाही. ओबीसी आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची तरतूद का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.

Women’s Reservation : जनगणना अन् मतदारसंघाची पुनर्रचना कधी होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

पीएम मोदींचा केला उल्लेख
ओवैसी म्हणाले की, संसदेत ओबीसी आणि मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, पण आज सभागृहात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व केवळ 20 टक्के आहे. ओवैसी यांनी या विधेयकाला निवडणूक जुमला असेही म्हटले आहे. काँग्रेस, सपा, द्रमुक, तृणमूल काँग्रेससह सभागृहातील सर्व विरोधी पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला. विधेयक मंजूर झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

राज्यसभेत मांडणार का?
लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकावर गुरुवारी (21 सप्टेंबर) राज्यसभेत चर्चा होणार आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ म्हणाले की, या विधेयकावर चर्चेसाठी साडेसात तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube