Women’s Reservation : जनगणना अन् मतदारसंघाची पुनर्रचना कधी होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

Women’s Reservation : जनगणना अन् मतदारसंघाची पुनर्रचना कधी होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर काल लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं. त्यानंतर आज या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार चर्चा झाली. या विधेयकावरुन जनगणना आणि मतदारांसघाच्या पुनर्रचना कधी होणार? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला, त्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीनंतर जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर, दोन खासदारांनी केलं विरोधात मतदान, ‘ते’ दोन खासदार कोण?

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, महिला आरक्षणाच्या या विधेयकामुळे युग बदलणार आहे. काल संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं, हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नारीशक्तीचा सन्मान केला जात आहे, पण काही पक्षांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकारण करण्यासाठीच असून निवडणुका जिंकण्यासाठी एक हत्यारही असू शकतं, पण मोदी आणि भाजपासाठी महिला सक्षमीकरण हा राजनैतिक मुद्दा नाही तर मान्यतेचा प्रश्न असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

Prakash Raj: ‘नेमकं रिकामं काय…? नरेंद्र मोदी…’, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली

देशात पहिल्यांदा ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा नारा पंतप्रधान मोदींनी दिला असून गुजरातमध्ये मोदींमुळेच महिलांना एक तृतीयांश आरक्षण मिळालं आहे, महिला आरक्षण विधेयकाची बाब संविधान संशोधनाचा भाग नाही, मोदींनी महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. महिलांसाठी जनधन योजनेत 70 टक्के खाते उघडली, महिलांना उज्वला गॅस कनेक्शन देऊन सन्मान केला, 3 कोटी महिलांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा सन्मानच केला असल्याचं म्हणत अमित शाह यांनी मोदींचं कौतूक केलं आहे.

शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या विधेयकावर सडकून टीका केली होती. केंद्र सरकारचं हे विधेयक आत्तापर्यंतचा सर्वाच मोठा जुमला असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.

काँग्रेससह इतर भाजपविरोधी पक्षाच्या खासदारांनीही टीका केली होती. अखेर आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेवर विधेयकामध्ये असलेल्या तरतूदी वाचून दाखवत जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube