Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे.

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागा देणारे महिला आरक्षण विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे मंजूरीसाठी पाठवले जाईल. यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

माझ्यासारख्या महिलांना आरक्षण नको, हा सरकारचा जुमला; आरक्षणाच्या बिलावर सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या?

नवीन संसदेचे कामकाज जुन्या पद्धतीने झाले. नवीन इमारतीमध्ये मतदान करण्याची अत्याधुनिक सिस्टम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारे मतदान झाले. खासदारांनी मतदान केल्यानंतर सर्व मतपत्रिका संसदेतील कर्मचाऱ्यांकडे दिल्या.

यावेळी, बहुतांश विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आणि सोबत ओबीसी कोट्यासह तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणीही केली.

पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल आणि इतर नेत्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. विरोधी पक्षात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चर्चा सुरू केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव, द्रमुकच्या खासदार कनिमोझी आणि टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह अनेक महिला विरोधी खासदारांनी सरकारवर निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube