पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

  • Written By: Published:
पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या विधेयकावरून लोकसभेत सकाळपासून चर्चा सुरू आहे. या विधेयकाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) राजीव गांधींचे स्वप्न म्हणत पाठिंबा दर्शवला आहे तर, दुसरीकडे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एक यादी दाखवत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. ते लोकसभेत महिला आरक्षणादरम्यान आयोजित चर्चासत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. (Rahul Gandhi On Women Reservation Bill)

 

महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवत राहुल गांधींनी या विधेयकाची अंमलबजावणी आतापासून झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी त्यांनी ओबीसी महिलांनाही आरक्षण देण्याची मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले की, सरकारमध्ये 90 सचिव आहेत, त्यापैकी फक्त 3 ओबीसी आहेत.सरकार ओबीसींचे ऐकत नसल्याचे म्हणत त्यांनी यादी दाखवत हे बदलण्याची मागणी सरकारकडे केली.

Women reservation : प्रमिला दंडवतेंनी सुरु केलेला लढा 27 वर्षांनी पूर्ण

या विधेयकात ओबीसींना आरक्षण देण्याची तरतूद असणे गरजेचे आहे मात्र, तसे यात दिसत नाहीये. भारत सरकारमध्ये  90 सचिव आहेत त्यापैकी फक्त 3 ओबीसी असून, हे चित्र धक्कादायक आहे. राहुल गांधींच्या या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाने सभागृहात गदारोळ केला. ओबीसी, दलित आणि आदिवासी किती आहेत हे शोधण्यासाठी जात जनगणना आवश्यक असल्याचे सांगत सरकारने  2011 चा डेटा जाहीर करावा अशी मागणी केली.

Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?

सरकार हा डाटा जाहीर करू शकत नसेल तर, तो आम्ही करू असा इशाराही यावेळी राहुल गांधींनी दिला. सरकार अनेक मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असून यातील प्रमुख मुद्दा जात जनगणना आहे. विरोधी पक्षाने जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करताच, सत्ताधाऱ्यांकडून इतर मुद्दे उपस्थित करत लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube