Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?

Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?

Women’s Reservation : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता या विधेयकावर लोकसभेत चर्चासत्र सुरु आहे. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचीच सध्या सर्वत्र चर्चा झाली आहे. प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करताना सुळेंनी हे विधान केलं आहे, यावेळी बोलताना सुळे यांचा रोख नेमका कोणाकडे होता? हीच चर्चा रंगलीयं.

WC 2023 : विश्चचषकाचा काऊंट डाऊन सुरू; पाकिस्तान, श्रीलंका अन् बांग्लादेश संघात निवडीवरून घमासान

सुळे म्हणाल्या, महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचे कल्याण व्हावे असे वाटते. प्रत्येकाचे एवढे चांगले नशीब नसते, असं सुळे महिला विधेयकावर संसदेत बोलताना म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच नाव न घेता टोला लगावला असल्याचं पाहायला मिळालं आहे.

भाजपचा हा एक नवीन जुमला ! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

तसेच महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्षांवर थेट आरोप करीत या विधेयकावरुन सत्ताधारी पक्षाला सुळेंनी घेरल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. सुळे म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी मला घरी जाऊन जेवण बनव, असा सल्ला दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Canada : खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात; कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने खळबळ !

पाटलांच्या या विधानावर भाजपने आपलं उत्तर स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, भाजपचे नेते अनेकदा महिलांवर वैयक्तिक टीका केल्याचं दिसून आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

नेहरू, कॅश फॉर व्होट अन्… PM मोदींनी सांगितल्या संसदेच्या इतिहासातील कडू-गोड आठवणी

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपली भूमिका केली. यावेळी ते म्हणाले, फक्त महिलांनीच महिलांबाबत बोलावं, असं काही नसतं भावांनादेखील बहिणींची काळजी असतेच, असं अमित शाह म्हणाले होते, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी संसदेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना कोणाचं नाव घेतलं नाही पण चंद्रकांत पाटील यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, त्यांच्या या विधानानंतर सुळेंचा रोख अजित पवार यांच्याकडेच होता, असंच काहीसं दिसून आलं आहे. मात्र, त्यांचा रोख नेमका कोणाकडे ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांचं विधान नेमकं कोणासाठी होतं? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube