भाजपचा हा एक नवीन जुमला ! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

  • Written By: Published:
भाजपचा हा एक नवीन जुमला ! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

नागपूर : लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा होऊन ते मंजूर होईल. या विधेयकाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे विधेयक या विशेष अधिवेशनात मंजूर झाले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे लागू होणार आहे. त्यावरून आता आम आदमी पक्ष व काँग्रेसने भाजपवर टीका करण्यास सुरू केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर (Bjp) सडकून टीका केली आहे. हा भाजपचा नवा जुमला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.


Breaking! 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन; युजर्सच्या तक्रारी

विजय वडेट्टीवाार म्हणाले, महिला आरक्षणासंदर्भात लोकसभेत विधेयक आणले गेले. परंजु या विधेयकाचा गाजावाजा, त्याचे उदो उदो करण्यात आले आहे. सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना प्रतिनिधित्व मिळेल असे वाटत असताना नव्या जुमल्याला समोर जावे लागले. मताचे राजकारण किती घाणेरडे असू शकते हा नवा पायंडा राजकारणात बघायला मिळत आहे. या विधेयकाची संसदेत घोषणा केली. पण प्रत्यक्षात 2026 मध्ये जनगणना होईल. त्यानंतर 2029 मध्ये अंमलबजावणीची भूमिका होईल. आता त्याचा गाजावाजा करत आहेत. त्यामुळे भाजपा हा एक नवीन जुमला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांचा आहे.

…पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला

तोपर्यंत राहुल गांधी हे पंतप्रधान होतील. तेव्हा इंडिया आघाडीचे सरकार असेल आणि महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस करेल. त्यासाठी या जुमलेबाज सरकारची वाट बघायची गरज पडणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

अरेरे ! अजितदादा तुम्हा वाघ पण…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हमाले,
राजकारणात सत्तेसाठी किती लाचारी सहन करावी लागते. सत्तेसाठी सर्व मर्यादा आता ओलांडल्याचे दिसत आहे. अरेरे ! अजितदादा तुम्ही वाघ आहात. पण ज्या पक्षासोबत सत्तेत गेलात, त्यांच्यात पक्षातील एक जण तुम्हाला लांडगा म्हणतोय हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अजितदादा तुम्ही वाघ आहात. एकदा तुम्ही जरा दाखवाच. सत्तेसाठी लाचार नाही ते. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या अशी अपेक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube