WC 2023 : विश्चचषकाचा काऊंट डाऊन सुरू; पाकिस्तान, श्रीलंका अन् बांग्लादेश संघात निवडीवरून घमासान

  • Written By: Published:
WC 2023 : विश्चचषकाचा काऊंट डाऊन सुरू; पाकिस्तान, श्रीलंका अन् बांग्लादेश संघात निवडीवरून घमासान

World Cup 2023 : भारतात सुरू होणाऱ्या यंदाच्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) अवघ्या 15 दिवसांचा कालावधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्चचषकातील सामन्यांना सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी एकून 10 देश सहभागी होणार असून, आतापर्यंत सात संघांनी टीमची घोषणा केली आहे. मात्र, पाकिस्तान संघाने अद्याप त्यांच्या संघाची घोषणा केलेली नसून, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात निवडीवरून घमासान सुरू असल्याचे चित्र आहे. (World Cup 2023 Team Annaousnment Update )

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; लोकसभेत सोनिया गांधींकडून भूमिका स्पष्ट

आशिया चषकातील पराभवानंतर पाकिस्तान संघात खळबळ

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात श्रीलंकेकडून (Sri Lanka) पाकिस्तान संघाचा पराभव झाला. या पराभवामुळे पाकिस्तानचे भारतीय संघासोबत अंतिम सामन्यात भारतासोबत खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. श्रीलंकेच्या संघाकडून पराभवानंतर पाकिस्तानी संघात (Pakistan Team) मोठी खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह जखमी झाला आहे. त्यामुळे तो यंदाच्या विश्वचषकात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. याशिवाय हरिस रौफच्या दुखापतीमुळेदेखील संघाची चिंता वाढली आहे. या सर्व अडचणींमध्ये संघात नेमकी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न PCB पुढे निर्माण झाला आहे.

पाकिस्तानशिवाय 1996 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेने आणि बांग्लादेशने देखील अद्यपपर्यंत विश्वचषकासाठी संघाची घोषणा केलेली नाही. ज्याप्रमाणे पाकिस्तानमधील चांगले खेळाडू दुखापतग्रस्त आहेत तसेच काहीशी परिस्थिती श्रीलंकेतील खेळाडूंची आहे. यंदा खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकासाठी भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका यादेशांनी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे.

Prakash Raj: ‘नेमकं रिकामं काय…? नरेंद्र मोदी…’, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली

अफगाणिस्तान
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

आशिया कप जिंकल्यानंतरही भारताला मोठा धक्का, आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान नंबर वन

भारत
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

नेदरलँड
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट

Asia Cup : भारत विरुद्ध INDIA वादाने टीमचे अभिनंदन : मॅच संपताच नेत्यांची राजकीय बॅटिंग

न्यूझीलँड
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, राबसेन ड्यूसेन .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube