नेहरू, कॅश फॉर व्होट अन्… PM मोदींनी सांगितल्या संसदेच्या इतिहासातील कडू-गोड आठवणी

  • Written By: Published:
नेहरू, कॅश फॉर व्होट अन्… PM मोदींनी सांगितल्या संसदेच्या इतिहासातील कडू-गोड आठवणी

PM Modi Speech In Parliament Special Session : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राल आज (दि. 18) सुरूवात झाली असून, जुन्या संसद भवनातून या विशेष सत्राला सुरूवात झाली असून, उद्यापासून (दि. 19) उर्वरित अधिवेशन संसदेच्या नव्या वस्तुतून चालणार आहे. या अधिवेशना सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) सभागृहाला संबोधित केले. यात त्यांनी संसदेचा 75 वर्षांचा इतिहास देशासमोर मांडला. आपल्या भाषणात मोदींनी पंडित नेहरू, कॅश फॉर वोट आणि कलम 370 आदी गोष्टींचा उल्लेख केला. एकूणच लोकसभेत पंतप्रधान मोदींनी संसदेच्या इतिहासातील गोड-गोड आठवणी सांगितल्या.

‘ऐतिहासिक निर्णयोंका सत्र है…’; PM मोदींच्या सूचक विधानानंतर विशेष अधिवेशनात येणार 8 विधेयके

नेहरूंच्या भाषण प्रेरणा देत राहिल

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदींना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या ‘मिडनाईट’ भाषणाची आठवण झाली. हे भाषण आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहिल असे मोदी म्हणाले. 14-15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री संविधान सभेत जवाहरलाल नेहरूंनी ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे ऐतिहासिक भाषण दिले.

आणीबाणी आणि कॅश फॉर व्होट घोटाळाही पाहिला

भाषणादरम्यान मोदींनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या सभागृहात आम्ही बांगलादेशची मुक्ती पाहिली आणि आणीबाणीही पाहिली आणि त्यानंतर लोकशाहीची पुनरागमनही पाहिले. मनमोहन सिंग सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मनमोहन सरकारमध्ये ‘कॅश फॉर व्होट’ घोटाळाही आम्ही पाहिला असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला.

विशेष अधिवेशनाचा राज्यघटनेत उल्लेखच नाही; मग आतापर्यंत 8 वेळा कसे झाले विशेष अधिवेशन

कलम 370 हटवल्याचा अभिमान

यावेळी पीएम मोदींनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचाही उल्लेख केला. कलम 370 हटवल्याबद्दल या सभागृहाला नेहमीच अभिमान वाटेल, असे पीएम मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या ‘हा देश राहिला पाहिजे’ या ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ दिला. मोदींनी यावेळी संसद भवनावरील दहशतवादी हल्ला आठवत भावुक झाले. हा हल्ला इमारतीवर नसून आमच्या आत्म्यावर झाल्याचे म्हणत त्यांनी अनेकांचे जीव वाचवणाऱ्या आणि वीर मरण पत्करणाऱ्या जवानांना नमक केले.

Punit Balan यांच्या मनात नक्की काय? जाणून घ्या त्यांचा प्रवास Letsupp Business Maharajas मध्ये

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube