लातूर महानगरपालिकेत शिंदेंचा डाव; तब्बल 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश
लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाला आधीच धडाका लावला आहे. (Election) लातूर महापालिका निवडणुकीमध्ये उभे असलेल्या तब्बल 17 अपक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पक्षात प्रवेशही केला आहे. शिंदे यांनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी झाल्याची चर्चा आहे.
लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काहीजण भाजपमध्ये, तर काहीजण स्वतंत्र निवडणूक लढवणारे तर काहीजण इतर पक्षात कार्यरत होते. त्या सर्वांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं सांगण्यात येत आहे.
सोलापुरमधून असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर वार, काय केला आरोप?
श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
लातूर महानगर पालिका निवडणूक (2026)
एकूण प्रभाग 18
एकूण जागा 70
भाजप – सर्व 70 जागा स्वतंत्र लढत आहे.
काँग्रेस – 70 (वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागेवर काँग्रेस आणि पाच जागेवर वंचित बहुजन आघाडी).
राष्ट्रवादी अजित पवार गट – 60 जागावर निवडणूक. तर दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार देणार.
राष्ट्रवादी शरद पवार गट – 17 जागेवर अधिकृत उमेदवार, स्वतंत्र लढत आहे.
शिवसेना शिंदे – 11 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.
शिवसेना ठाकरे – 09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.
MIM -09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.
