Download App

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांचा मृत्यू, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.

  • Written By: Last Updated:

Heavy Rain in Marathwada : मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. (Marathwada) मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यामध्ये एका दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे .एक जण जखमी झाला आहे. तर अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. खास करून नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले.

एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत .तर लातूरमध्ये स्थानिक बचावपथक कार्यरत आहे . काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय .जवळपास सव्वाशे जनावर दगावली आहेत. परळी तालुक्यातील कौडगांव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने अंदाज न आल्याने बलेनो कार बाहुन गेली. त्यामध्ये एकुण (04 व्यक्ती होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने 1 ते 4 वाजेदरम्यान शोध घेतला असता 03 व्यक्तीना सुखरुप बाहेर काढण्यात आले. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. पुणे येथून एनडीआरएफ टिम घटनास्थळी रवाना झाली आहे.

नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; लोक साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, अनेक लोक अडकले

नांदेड लेह धरणाच्या पाण्याच्या पातळीत इगफुटी व मळ लालर, उदग्रीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून काही गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, मिगेली व हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्याला राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे.

देगलूर- मोजे होसणी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे लंडी नदीला भरपूर प्रमाणात पार फुलावरून पाणी वाहत आहे बाहेरगावी जाण्यासाठी चहुबाजूने रसंग बंद झाला आहे तूपर्शळगाव पुलावर आहे, रस्ता बंद आहे. त्याचबरोबर हदगांव- मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील शिकार ता. हदगाव येथील पुलावरुन पाणी गेले आहे. बाभळी ता. हदगाव प्रेथ पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावाच्या शिवारात शिरले असून पाऊस चालू असून बाभळी दळणवळणाचा रस्ता बंद आहे. कोणतीही जीवितहानी नाही.

लातूर

1. संपर्क तुटलेली गावेः मौजे बोरगाव, धडकनाळ तालुका उदगीर

2. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या व माहिती: 70 कुटुंब (एकूण स्थलांतरितांची संख्या: 210)

मराठवाड्यात एकूण किती नुकसान झाले?

छत्रपती संभाजीनगर

जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 71
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 2160
शेती नुकसान : 3 हेक्टर

हिंगोली

मयत व्यक्ती :01
जनावरांचा मृत्यू : 16
पडझड झालेली घर-गोठे : 26
बाधित गावं : 185
बाधित शेतकरी : 9023
शेती नुकसान : 10789 हेक्टर

नांदेड

मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 181
पडझड झालेली घर-गोठे : 181
बाधित गावं : 363
बाधित शेतकरी : 91559
शेती नुकसान : 84188 हेक्टर

बीड

मयत व्यक्ती : 01
जनावरांचा मृत्यू : 01
पडझड झालेली घर-गोठे : 06
बाधित गावं : 24
बाधित शेतकरी : 1465
शेती नुकसान : 930 हेक्टर

लातूर

पडझड झालेली घर-गोठे : 11
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 161
शेती नुकसान : 184.5 हेक्टर

धाराशिव

जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 108
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर

मराठवाड्यात एकूण नुकसान

जखमी :01
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 107
पडझड झालेली घर-गोठे : 350
बाधित गावं : 798
बाधित शेतकरी : 119964
शेती नुकसान : 111420.55 हेक्टर

follow us