Marathwada Politics : पक्षाने तिकीट दिले तर ठीक अन्यथा बंडखोरी; मराठवाड्यातील प्रमुख लढती
Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या दोन तीन वर्षापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असलेले अनेक इच्छुक आता पक्षाने तिकीट दिले तर ठीक अन्यथा अपक्ष, अशा इरेला पेटलेले आहेत. (Marathwada) यातून प्रतिष्ठेचे मतदार संघही सुटलेले नाहीत. त्यामध्येच आता एकाच पक्षाचे दोन पक्ष झाल्याने आता मागच्या निवडणुकीत सोबत काम केलेले एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. तर काही ठिकाणी मोठी बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे. तसंच, या लढाईत दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असाही सामना पाहायला मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत ? : प्रतिष्ठेच्या मतदार संघांपैकी छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ एक आहे. २०१४ मध्ये या मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, भाजपचे किशनचंद तनवाणी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी लढत झाली होती. त्यात जलील यांचा विजय झाला. २०१९ मध्ये जलील यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले. याच वर्षी विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांनी एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा प्रदीप जैस्वाल (शिंदे गट) विरुद्ध एमआयएम आणि उबाठा गट अशी लढत रंगणार आहे. उबाठा गटाचाडून किशनचंद तनवाणी यांना संधी मिळाली, तर पुन्हा एकदा मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा एमआयएमला होईल, असे आडाखे बांधले जात आहेत.
इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
पश्चिमचा गड कोण राखणार? : शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या राखीव मतदार संघातून अनेकांनी कंबर कसली आहे. त्यात नुकतेच भाजपमधून उबाठा गटात गेलेले माजी नगरसेवक राजू शिंदे आघाडीवर आहेत. पक्षाने त्यांना संधी दिली, तर मतदार संघात थेट लढत होण्याची शक्यता आहे. याच मतदार संघातून उबाठा गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पैठणमध्ये काय होणार? : माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदार संघातून त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना शिंदे गटाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. एकाच घरात खासदार आणि आमदार असावेत, अशी भुमरे यांची व्यूहरचना आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास उबाठा गटाचे सचिन घायाळ आणि दत्तात्रय गोर्डे इच्छुक आहेत. भुमरे यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्याविरुद्ध तालुक्यात सर्व निष्ठावान शिवसैनिक एकवटले आहेत. तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. मात्र, तालुक्यातील वातावरण अजूनही भुमरे यांना अनुकूल आहे, असं मानता येत नाही. या पार्श्वभूमीवर विलास भुमरे यांनाही चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे
भोकरमधून कोण ? : नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर २००९ मध्ये निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण, २०१९ मध्ये स्वतः अशोक चव्हाण विजयी झाले. आता त्यांची कन्या श्रीजया चव्हाण याच पारंपरिक मतदार संघातून विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांना भाजपकडून संधी मिळेल का? भाजपच्या उमेदवार म्हणून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. तसंच, नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यापासून सुरू झालेल्या घडामोडी त्यांचे सख्खे मेहुणे भास्करराव खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. भाजी खासदार असलेले खतगावकर चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेले होते. परंतु, ते काँग्रेसमध्ये परतल्यामुळे त्यांच्या सुनबाई यांची नायगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांना भाजपने तीनवेळा उमेदवारी नाकारली, असा आरोप खतगावकर यांनी केला आहे. या पक्षांतरामुळे नराचगाव मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे
तुळजापुरात चुरस? : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदार संघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. वयाची नव्वदी गाठलेली असतानाही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. त्यांनी भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे. मधुकररावांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. तेथे महायुतीचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर सुनील चव्हाण पुन्हा कॉंग्रेसमध्ये जातील काय, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, मधुकररावांनी या शक्यतेला आपली उमेदवारी जाहीर करून पूर्णविराम दिला. याच मतदार संघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक जगदाळे हेदेखील इच्छुक आहेत. मात्र, महाआघाडीचे तिकीट काँग्रेसलाच मिळेल आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा मधुकररावांना विश्वास वाटतो.
परळीत काय होणार? : ज्यांनी पक्ष सोडला, अशा सर्वच आमदारांना धडा शिकविण्याचा चंग शरद पवार यांनी बांधलेला असल्यामुळे मराठवाड्यात अजित पवार गटाच्या आमदारांपुढे आव्हान उभं राहणार आहे. उमेदवार निश्चित झालेले नसले तरी मतदारसंघ मात्र तरले आहेत. त्यात परळी मतदारसंप मोडतो. येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान उभं करण्याची तयारी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर परळी काबीज करण्याची मोर्चेबांधणी शरद पवार गटाने सुरू केली आहे. रत्नाकर गुट्टे यांचे जावई त्याचाच एक भाग म्हणून पवार यांनी गंगाखेडचे राराप आमदार राजाभाऊ फड यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे पवार यांच्या पक्षाला बळ मिळालं आहे. परळीतून गुट्टे यांचे जावई फड आणि गुट्टे यांच्या पत्नी सुधामती गुट्टे यांनीही ‘तुतारी कडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.