Download App

एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याचं धमकी प्रकरण; उघड झालेलं बुलढाणा कनेक्शन काय?

एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व तपास

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde Receives Bomb Threat : नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करून बुलढाण्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

बुलढाणा कनेक्शन?

तपासात या धमकीचा धागा थेट बुलढाणा जिल्ह्याशी जोडल्याचं समोर आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने देऊळगाव राजा येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं. मंगेश अच्युतराव वायाळ (वय ३५), अभय गजानन शिंगणे (वय २२) हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी तातडीने मुंबईत आणले जात आहे.

मोठी बातमी :डेडिकेटेड टू कॉमने मॅन एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवणार; धमकीच्या ई-मेलने खळबळ

एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व तपास यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तसंच, हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी सुरु आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरु आहे.

follow us