केजरीवालांचा पाय खोलात! शीशमहलची तपासणी होणार; CVC चा आदेश धडकला

केजरीवालांचा पाय खोलात! शीशमहलची तपासणी होणार; CVC चा आदेश धडकला

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. सेंट्रल विजीलेन्स कमिशनने त्यांच्या बंगल्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आता केजरीवाल यांच्या शीशमहलं बंगल्याची सखोल तपासणी होणार आहे. निवडणूक प्रचारातही शीशमहल वरून चांगलाच धुराळा उडाला होता. केजरीवाल यांच्या या आलिशान आणि टोलेजंग बंगल्यावरुन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केजरीवालांना फैलावर घेतले होते. आता तर या बंगल्याची तपासणीच होणार असल्याने केजरीवालांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीपीडब्ल्यूडीने केलेल्या आरोपांची चौकशी करा असे आयोगाने सांगितले आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जवळपास आठ एकरांत पसरलेल्या या भव्य बंगल्याचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केजरीवाल या बंगल्यात 2015 पासून मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत राहत होते.

दिल्ली गमावली पण केजरीवालांच्या मागचा ससेमिरा कायम; जेलमध्ये जावंच लागणार

केजरीवालांवर कोणते आरोप

CVC ने दोन तक्रारींची दखल घेतली. यानंतर लोक निर्माण विभागाकडून अहवाल मागवला. या अहवालाच्या आधारावर आता सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. रोहिणी मतदारसंघातील भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सीव्हीसीकडे दाखल केलेल्या पहिल्या तक्रारीत अरविंद केजरीवाल यांनी आठ एकर परिसरात भव्य महाल तयार करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर गुप्ता यांनी दुसऱ्या तक्रारीत ६ फ्लॅग स्टाफ रोड स्थित बंगल्याची दुरुस्ती आणि अंतर्गत सजावटीवर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला असा आरोप केला होता.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपने आरोप केला होता की बंगल्याच्या रिनोवेशनसाठी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले. भाजपनेच या बंगल्याला शीशमहल असे नाव दिले होते. मागील वर्षात 9 डिसेंबर रोजी भाजपने एक व्हिडिओ प्रसारीत केला होता. यामध्ये दिल्लीचे सीएम हाऊसचे इंटीरियर दाखवण्यात आले होते.

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडून तक्रार दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांचा बंगला चार सरकारी संपत्तीचे एकत्रीकरण करून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेला रद्द केले पाहिजे. शपथविधीनंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नाही असे त्यांनी सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube